पुस्तक बद्दल:
अनिलला आजाराला आणि मृत्यूला घाबरण्याची एक विलक्षण भीती, किंबहुना एक मनोरोग, ह्या भीती आणि मित्रां मुळे दारू पिण्याची सवय, ह्या गोष्टींनां कंटाळुन त्याची पत्नी मुलंबाळं घेऊन त्याला सोडून जाते. आजार विद्रुप रूप घेतो आणि मग मनोरोगतज्ज्ञांच्या मदतीने तो कसा सावरतो, आपल्यातल्या सुप्त गुणांना कसा वाव देतो आणि कसं कुटुंब पुन्हा एकत्र होतं त्याची आणि मोनोविज्ञाना आणि आजाराचा भ्रम या रोगा बद्दल माहिती देणारी एक अविस्मरणीय आणि चित्त थरारक कथा.
लेखक बद्दल:
प्रशांत मारुती केदारे हे मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे पदवीधर, विविध कॉर्पोरेट क्षेत्रातील १५-१६ वर्षांचा कार्याचा अनुभव. जीवनात प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने पाहणे आणि तिची खोलवर जावुन माहिती जाणून घेणे हा त्यांचा स्वभाव आणि ह्या स्वभावा मुळे वाचनाची आणि लिखाणाची त्यांना प्रचंड आवड. आपल्या कुतूहलातून आणि कल्पनाशक्ती च्या बळावर हि पहिली मराठी आकृती साकारण्यात यशस्वी.