About the Book:
माणसाला निसर्गाने एक खोड दिली आहे. ती म्हणजे बाह्य रंगावरून त्याच्या आयुष्याचा पोत ठरवण्याची. पण हे गैर आहे. माणसाच्या अंतरंगात डोकावल्याशिवाय माणूस कळत नाही. हे अंतरंग वाचण्याच काम ज्यांचे हात लिहिणारे आहेत, तेच करतात. प्रत्येकाची हातोटी वेगळी असते. पांढरा स्वच्छ ससा, पांढरे निवांत फिरणारे ढग, शारदेची धवल शोभायुता मूर्ती आवडते. पण एखादी पांढरी व्यक्ति समोर आली तर लगेच नजर दुसरीकडे वळते. एखाद्याच्या वैगुण्यावर बोट ठेवण्यापेक्षा त्याला प्रेम दिलं, आपलसं केलं तर काय बिघडेल? ह्याच विचारांचा परामर्श लेखकाने घेतलाय कोड कौतुक ह्या कथेमध्ये.
आजचं युग स्पर्धेचं आहे. पैसा मिळेल तितका कमीच आहे. नेमके हेच विचार वाचकांच्या मनात रूजवण्याची कला, लेखकाने खुरटलेलं रोप, नाही मनाची तयारी ह्या कथांमध्ये उत्कृष्ट मांडली आहे.
स्त्रियांच भावविश्व आता रूंदावत चाललं आहे.पण तरी ही त्यांना अनेक समस्या, अत्याचार, मानहानी सहन करावी लागत आहे. त्यांचं प्रतिबिंब अगदी सहज आणि मोजक्या शब्दांत लेखकाने मांडल आहे. समाजजीवन, मानसिक घडामोडी, संस्कृती या सगळ्या मानवी अंगभूत गुणांचं बारकाईने टिपण करण्यात लेखक यशस्वी झालाय.
ती मिळाली तर लेखकाला नक्कीच आनंद वाटेल ह्या कोड कौतुकाचं.
About the Author:
राजेंद्र यशवंत वैद्य १) आठवणीतील कविता २) काव्य तरंग ३) शिरिज फुले यांचे मार्फत यु टयुब साठी कविता वाचन प्रा.प्रदिप ढवळ यांच्या “शिवबा” नाटकाचे गीत लेखन. ११० प्रयोग संपन्न. बावीस प्रातिनिधीक कविता संग्रहातून कविता समाविष्ट. कल्पतरूची उंची हा कविता संग्रह प्रकाशित.