About the Book:\n\n\n\nआयुष्य जगताना जोडली जातात अनेक नाती-गोती...\n\nकाळाच्या प्रवाहात वाहत जातात त्यातली कित्येक नाती...\n\nपैशामागे धावताना माणूस विसरतो रक्ताची नाती...\n\nनव ते हवं या प्रमाणे नवीन नाती जपताना जुनी नाती मात्र हळूच निसटून जाती...\n\nकोण आपले, कोण परके ना कोणास कळती...\n\nटिकून राहती तीच नाती जे करीती खोटी स्तुती...\n\nभल्या गर्दीत पडे एकटा ज्यास न जमली ही कॄती...\n\nजुन्या आठवांच्या स्मॄतीमध्येच काहीजण रमून जाती...\n\nतर काही मात्र नव्या नात्याच्या मागे मागे धावती...\n\nकोणी नाही कोणाचे हे जरी असले खरे...\n\nतरी मन हे वेडे मात्र उगाच अपेक्षा करते का बरे?\n\nभंग होता त्या अपेक्षांचा, नकळत ओल्या होतात कडा...\n\nतुटलेल्या या नात्यातून माणूस मात्र नक्कीच शिकतो एक धडा...\n\nअसली जरी रक्ताची नाती तरी लोकं मात्र पैसा असे त्यालाच पुसती...\n\nपैसा आणि स्टेटस जपणारी दिखाऊ नाती...\n\nह्या साऱ्या मधून हरवून जाती खरी अनमोल नाती...\n\n\n\nआपले आयुष्य म्हणजे अनेक नात्यांच्या कडू-गोड आठवणींचे मिश्र लोणचं असते...या लोणच्यात आवश्यक असतो तो शब्दांचा खार...तो नेहमी जपून वापरावा लागतो, कारण जास्त प्रमाणात झाला तर आयुष्यातील नात्यांचं लोणचं खराब होतं...कमी प्रमाणात झाला तर ते लोणचे चांगले मुरत नाही... म्हणून चांगल्या वाईट कोणत्याही प्रसंगी शब्द हे नेहमी जपून वापरावे लागतात. कुठे, कसं आणि किती शब्द वापरायचे याचे प्रमाण एकदा समजले की, आपल्या आयुष्यातील अनेक नात्यांचे मिश्र लोणचे रुचकर होत जाते अन चांगले मुरते.\n\n\n\nAbout the Author:\n\n\n\nलेखिकेला लहानपणापासूनच लिखाणाची आवड आहे. त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअर शिक्षण घेतले आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी विप्रो मधील नोकरी सोडल्यानंतर आता त्या फोनिक्स क्लासेस घेतात. अनेक ऑनलाईन पोर्टल वर त्या लेखन करतात. अनेक स्पर्धांमध्ये त्यांना विजेतेपद मिळाले आहे.\n\n\n\nलेखिकेला अभिनय आणि नृत्य याची देखील आवड आहे. ऑथर ऑफ इयर 2021 हा किताब स्टोरीमिररकडून मिळाला आहे. तसेच मराठी साहित्यामध्ये केलेल्या कामगिरीसाठी विद्या उत्तेजक पुणे यांजकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड त्या नेहमीच करत असतात. कथांमधून समाज प्रबोधन घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. .