सर्वोत्कृष्ट 5 काल्पनिक व सामाजिक पुस्तकांचा संच आजोबा भाड्याने देणे आहे : या पुस्तकात कुटुंबे आपल्या वेगवेगळ्या कौटुंबिक समस्यांची उत्तरे शोधत असताना अचानक वर्तमानपत्रात सापडलेली एक आगळी वेगळी जाहिरात आणि त्यानंतर काही तरी नवीन करण्याचे विचार येतात आणि त्यातूनच एक नवीकोरी कल्पना मिळाली\nइंद्रधनुष्य : आत्मविश्वास, संयम, धाडस, कष्ट घेण्याची प्रवृत्ती, नवीन गोष्टी शिकण्याचा मानस, जबर इच्छाशक्ती, ही इंद्रधनुष्य रुपी ""सप्तरंगी"" सप्तसूत्री ज्या व्यक्तींमध्ये आहे ती नक्कीच यशस्वी होऊन उत्तर मधून भरारी मारू शकते,हेच प्रत्येक कथा या पुस्तकातील शिकवते\nकोड कौतुक : समाजजीवन मानसिक घडामोडी संस्कृती या सगळ्या मानवी अंगभूत गुणांचा बारकाईने टिपण्या करत वास्तव आणि कल्पनाविलास याचा सुरेख संगम या संग्रहात आहे\nआजारांचं फॅशन : मनोविज्ञान आणि आजाराचा भ्रम या रोगाबद्दल माहिती देणारी एक अविस्मरणीय आणि चित्तथरारक कथा\nत्रिकोणीय सामना : या कथासंग्रहात 25 विनोदी सामाजिक कथांचा समावेश आहे.