"तरूण प्रतिभाशाली व्यक्तींचे करिअर त्याने सहजपणे विघडवून टाकले! अनेकांची उज्वल भविष्ये यानेच तर धुळीस मिळवली. तो तुमच्यासमोर मोठी प्रतिकूलता, अशक्य वाटणारी आणि सहन करता न येणारी लज्जास्पद स्थिती गती निर्माण करतो. तुम्हाला त्याचं नाव माहिती आहे? अहंकारा हाच सर्वात मोठा शत्रू आहे. आपली महत्त्वाकांक्षा, यश-वैभव तसेच आपल्यातील लवचिकतेचा तो नाश करतो.
आपला आंतरिक विरोधक कोण असेल, तर तो अहंकार आहे! जगभरातील जवळ जवळ प्रत्येक संस्कृतीत, कलेच्या प्रांगणात आणि काळाच्या प्रत्येक पावलाबरोबर अनेक कर्तृत्ववान तसेच महान व्यक्तींच्या जीवनकथेत तुम्हाला तो सहजपणे आढळेल.
प्रस्तुत पुस्तकाच्या प्रत्येक पानामध्ये, रायन हॉलिडे ऑपल्याला वस्तुस्थितीदर्शकतेसह ध्यानावस्थेकडे घेऊन जातो. साहित्य, तत्त्वज्ञान तसेच इतिहास यातील दाखल्यांच्या अनुषंगाने अहंकारातील दाहकता व विध्वंसकता लेखक नेमकेपणाने उलगडून दाखवतो. त्याच्या दर्शनातून आपल्याला एक प्रकारचा समजूतदारपणा व शहाणपणा येतो. 'आत्मविश्वासाला चिकटून रहात, एकालवचिकतेने व ग्रहणशीलतेने तसेच वास्तसन्मुखतेने आपल्या प्रेरणांवर विश्वास ठेवा! आपण आपल्या मीत्वावर मात करायला हवी! मुख्य म्हणजे, अहंकाराने आपल्यावर आक्रमण करण्याआधी, आपणच त्याचा विध्वंस घडवून आणला पाहिजे, असा सांगावा रायन आपल्याला देतो."