"द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक' या आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक मार्क मॅन्सन यांचे आशा बाळगण्यातील अडचणींवर हटके मार्गदर्शन करणारे पुस्तक. आपण अतिशय मनोरंजक काळात राहतो. आपल्याकडे जे आहे, ते सर्वोत्तम आहे आणि तरीही सगळ्यांची हानी होत चालली आहे, असं वाटतं. काय चाललंय? जर कुणी एक व्यक्ती आपल्या सध्याच्या आजारावर बोट ठेवू शकते आणि आपल्याला सुधारू शकते, तर ती व्यक्ती म्हणजे, मार्क मॅन्सन, 'आशावादी व्हा!' या पुस्तकात धर्म, राजकारण, पैसा, मनोरंजन आणि इंटरनेट यांचे विच्छेदन करण्यासाठी मार्क मॅन्सन खंडीभर मानसशास्त्रीय संशोधनाचा, तसेच प्लेटोपासून टॉम वेट्स या तत्त्वज्ञांच्या कालातीत ज्ञानाचा आधार घेतो. त्याच्या लेखनातून सतत दिसणाऱ्या विनोद आणि विद्वत्ता यांच्या मिश्रणातून मार्क मॅन्सन आपल्याला स्वतःशीच प्रामाणिक राहण्याचं आणि आपल्या श्रद्धा, आनंद, सुख, स्वातंत्र्य, इतकंच नव्हे तर; आपली आशेची व्याख्या खुलेपणानं नाकारण्याचं आव्हान देतात. आधुनिक काळातील एका श्रेष्ठ लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक येत्या अनेक वर्षांचा अजेंडा ठरवेल.