जीवन कौशल्ये, जीवन मूल्ये आणि हार्ड स्किल्स या एकूणच सर्व प्रकारच्या जीवन व्यवहारांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जीवन विषयक कौशल्यांची सविस्तर ओळख या पुस्तकात करून दिली गेली आहे. सोपी, सहज आणि प्रवाही भाषा, कथनाला पूरक अशी भोवतालच्या अवकाशातील उदाहरणे, भारतीय पार्श्वभूमी वरील मांडणी, कृती कार्यक्रमासह रेखाचित्रे ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यासह सर्व वयोगटातील व्यक्तींना सदर पुस्तक उपयुक्त ठरावे असे आहे.