श्री. राजेंद्र भामरे हे सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून २०१८ साली महाराष्ट्र पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी केलेल्या विविध तपासांच्या सत्यकथा या पुस्तकात आहेत. त्यांच्या सेवा कालावधीत त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक , पोलीस महासंचालक पदक व अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या कथा काल्पनिक नसून सिद्धहस्त अनुभवी तपासी अधिकाऱ्याने , कल्पकतेने केलेल्या तपासाच्या सत्यकथा आहेत. आपराध्याला शोधून काढणे हे जसे तपास अधिकाऱ्याचे कार्य आहे तसेच निरपराध्यांचे रक्षण करणे हेही त्याचेच काम होय. गेल्या चाळीस वर्षांपासून ते आजपावेतो गुन्हेगारी क्षेत्राचे बदललेले स्वरूप, चोरी,दरोडा ते सायबर क्राइम या साऱ्यांचा परामर्श घेणारे पुस्तक . खबरे म्हणजे काय ?, इलेक्ट्रॉनिक्स फूटप्रिंटस् म्हणजे काय, पोलीस तपासा तपासातील त्यांचे महत्त्व काय असते, हे सांगणारे पुस्तक. आजच्या घटकेला सायबर सुरक्षा हा जीवनातील महत्वाचा घटक बनला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर एकीकडे वाढत असताना, दुसऱ्या बाजूला आपण सायबर साक्षर असणे हे अत्यानंत महत्वाचे बनले आहे. परिस्थितीचा नेमका अभ्यास, लोकसंपर्क, विश्वास संपादन, कल्पनाशक्ती, बहुश्रुतान्त, हे सर्व पणाला लावूनच निष्कर्षापर्यंत पोहोचाव लागेल