"‘पीसीओएस’ हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणारा
एक सर्वसाधारण आजार आहे. भारतात गेल्या दहा वर्षांत हा
आजार एखाद्या साथीसारखा पसरला आहे. मासिक पाळीच्या
तक्रारी आणि वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या अनेक
पेशंट्समध्ये अनपेक्षितपणे ‘पीसीओएस’चे निदान होते.
‘पीसीओएस’ हा खरे तर एक लक्षणसमुच्चय आहे.
अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, चेहऱ्यावर अनावश्यक केस
उगवणे, मुरूम (तारुण्यपीटिका), वजन वाढणे, डोक्यावरचे
केस गळणे इत्यादी. अनेक लक्षणे ‘पीसीओएस’मध्ये एकत्रित
आढळतात.
हे पुस्तक लिहिताना आंतरराष्ट्रीय ‘पीसीओएस
मार्गदर्शक सूची २०१९’ विचारात घेतली आहे. यातील सर्व
माहिती पूर्णपणे शास्त्रशुद्ध आणि आंतराष्ट्रीय मान्यताप्राप्त
संस्थांनी अधिकृत केलेली आहे. या पुस्तकात ‘पीसीओएस’शी
लढण्यासाठी नेस्ट दृष्टिकोन सांगितलेला आहे. हा दृष्टिकोन
आहार, व्यायाम, तणाव नियंत्रण आणि औषधोपचार या
चतुःसूत्रीवर आधारित आहे. विश्वासार्ह, अधिकृत, वैज्ञानिक
ज्ञानाचा वापर करून आपण ‘पीसीओएस’सारख्या समस्येवर
विजय मिळवू शकालच; इतकेच नव्हे, तर उत्तम आरोग्यासाठी,
वजन कमी करण्यासाठीही हा दृष्टिकोन आदर्श ठरेल."