बरेचदा ज्या कौशल्यांकडे दुर्लक्ष करण्याकडे आपला कल असतो, ती कौशल्ये कोणती, हे समजून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ती कौशल्येच आपल्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात, हे तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या महत्त्वाच्या शास्त्रीय शोधांमध्ये निरीक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? जगातल्या नेतेमंडळींनी आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संवादकौशल्याचा उपयोग कसा करून घेतला, हे तुमच्या ध्यानात आले आहे का? मोठाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी ग्राहक आणि कर्मचारी यांच्याशी सुरळीत नातेसंबंध निर्माण करण्यासाठी उद्देशनिश्चितीचा कसा वापर करून घेतला आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? आर्थिक विकासाच्या शर्यतीत भारताची पिछेहाट का झाली, हे तुम्हाला समजून घ्यायचे आहे का? मानवी समाजाला शहाणपण येण्यासाठी विस्तव कसा कारणीभूत ठरला, हे तुमच्या लक्षात आले आहे का ? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दुर्लक्षित कौशल्यांचे सामर्थ्य या पुस्तकात मिळतील. अनेक रंजक हकिकती आणि गोष्टी यांच्या साहाय्याने ती उत्तरे वाचकांसमोर ठेवलेली आहेत, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. हे पुस्तक फक्त समस्यांची जंत्री तुमच्यापुढे ठेवत नाही, काही जटिल समस्यावरचे उपायही सांगते. हे पुस्तक म्हणजे- विद्यार्थी, नेते आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या शिडीवरून भराभर चढून जाऊन स्वतःचा उत्कर्ष करू पाहणारे इच्छुक अशा सर्वांसाठी तळहातात मावू शकेल, असा माहितीचा खजिना आहे. पुस्तकातील पन्नासहून अधिक कथा व हकिकती यांच्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक झाले आहे.