राईट थिंथ, राईट नाऊ! योग्य आहे, तेच करा! तेही आत्ताच करा, हा सांगावा प्रस्तुत ग्रंथात रायन हॉलिडेने दिला आहे. चांगली गुणवान मूल्ये, चांगले चारित्र्य तसेच चांगली कृती यांनी तुडूंब भरलेल्या जीवनशैलीचा आग्रह धरीत असताना, रायन हॉलिडे व्यक्तीला ‘स्व’कडून स्वेतरांकडे, ‘मी’कडून आम्हीकडे म्हणजेच अवतीभोवतीच्या सामाजिक-राजकीय जीवनाकडे आणि अखेरीस परिपक्व विरागी मनाने विश्वात्मकतेकडे जगण्याची दिशा व दृष्टी दर्शवतो. हा परिवर्तनाचा एक सर्जक मार्ग आहे. यातही या अनंतमयी सद्भावी मार्गावरुन उच्चतम धैर्याने व मनोबलाने वाटचाल करणार्या इतिहासातील प्रभृतींचे दाखले रायन हॉलिडे यांनी दिले आहेत. ते अभ्सासण्यासारखे आहेत. महात्मा गांधी, मार्कस ऑरेलियस, मार्टिन ल्यूथर किंग, हॅरी ट्रुमन, आयझेनहॉवर, नेल्सन मंडेला, जिमी कार्टर, फ्रेडरिक डग्लस, ऑस्कर वाईल्ड, लू गेहिृग, अँजेला मर्केल, फ्लॉरेन्स नाईटिंगेल, अब्राहम लिंकन यांच्यासह अनेक प्रभृतींचे जन्मव्रत आणि त्यांची सखोल-समद्ध आणि उदार जीवनशैली यांचा प्रकाशमय परिवर्तनशाली मार्ग, आपल्या सखोल चिंतनासह रायन हॉलिडे उलगडून दाखवतो. लेखकाचेे हे परिशीलन वाचकाला निश्चित अंतर्मुख करीत विश्वात्मक बनवेल, यात शंका नाही.