"ज्या आधारासाठी तुम्ही पात्र आहात, तो स्वतःला देण्याची वेळ आली आहे.
'द फाईव्ह सेकन्ड रूल' ह्या गाजलेल्या पुस्तकाद्वारे मेल रॉबिन्स ह्यांनी जगभरातल्या लाखो लोकांना प्रेरणेमागचं पाच सेकंदांचं गुपित उलगडून दाखवलं आहे. आता तशीच दुसरी सोपी आणि सिद्ध झालेली पद्धत 'द हाय फाईव्ह हॅबिट' घेऊन त्या आल्या आहेत. त्यायोगे तुम्ही तुमच्या आयुष्याचं नियंत्रण हातात घेऊ शकता.
शीर्षकामुळे गोंधळून जाऊ नका. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला 'हाय-फाईव्हफ' करणं अपेक्षित नाही. ते तर तुम्ही आधीच करत आहात, तुमच्या आवडत्या चमूला प्रोत्साहन देत आहात, तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर आनंद साजरा करत आहात. आपल्या आवडत्या बाबींचा पाठपुरावा करणाऱ्यांना आधार देत आहात. हेच प्रेम आणि प्रोत्साहन तुम्ही स्वतःला देत असल्याचा विचार करून पाहा. किंवा, तो दैनंदिन सवयीचा एक भाग करून पाहा. तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही.
तुमच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाचा व्यक्तीला आरशात पाहिलं, तर जी व्यक्ती तुमच्याकडे रोखून पाहत आहे; तिला म्हणजेच स्वतःला प्रोत्साहन देण्याचे डझनाहून अधिक प्रभावी मार्ग या पुस्तकातून तुमच्यासमोर येतील.
विज्ञानाधारित सुज्ञतेचा वापर करत, वैयक्तिक अनुभवाची जोड देत, आणि जगभरातल्या अनेकांच्या आयुष्यात हाय- फाईव्ह हॅबिटने घडवून आणलेल्या परिवर्तनाचा (या पुस्तकातून त्यापैकी अनेकजण तुम्हाला भेटणार आहेत) वापर करत मेल तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला आणि त्या विश्वासाचं रूपांतर सवयीत करायला शिकवते.
""द हाय फाईव्ह हॅबिट"" हे साधं, पण महत्त्वपूर्ण साधन आहे. आयुष्याकडे पाहण्याचा तो सर्वांगीण दृष्टिकोन आहे. त्याने तुमच्या वृत्तीत, मनोधारणेत आणि वर्तणुकीत बदल घडून येईल. इथून पुढे हसायला, शिकायला आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण सुखी आणि समाधानी जीवन जगायला स्वतःला सिद्ध करा."