"शत्रुराष्ट्रातही लोकप्रियता मिळवणारा आणि जगभराच्या तरुणाईला आजही भुरळ घालणारा अनॅस्टो चे गव्डेरा या क्रांतिकारकाच्या देशाटनावर आधारित त्याच्या अत्यंत मनोरंजक अशा ‘द मोटरसारकल डायरीज या प्रसिद्ध पुस्तकाचा रसाळ अनुवाद,
अर्नेस्टो चे गव्हेरा, हा एल चे किंवा फक्त चे म्हणून ओळखला जाणारा, एक
मार्क्सवादी क्रांतिकारक, चिकित्सक, लेखक, स्वप्रिल विचारवंत, गनिमी नेता
मुत्सद्दी राजकारणी आणि लष्करी सिद्धान्तकार होता. तो क्यूबन क्रांतीचा एक
प्रमुख नेता होता. त्याच्या मृत्यूनंतर गव्हेरा हा जगातल्या सगळ्याच वरुणांच्या
गळ्यातला ताईत झाला. इटका की, त्याचे फोटो असलेले टी-शर्ट्स आणि
कॅप्स आजही तरुणांच्या अंगावर पाहायला मिळतात.
या विस्तारित आवृत्तीमध्ये २३ वर्षीय अर्नेस्टोनं अमेरिका खंडाच्या प्रवासात
घेतलेले फोटो आणि नकारो, अलैदा गव्हेरा-मार्च या त्याच्या मुलीची प्रस्तावना,
सुप्रसिद्ध लॅटिन अमेरिकन कची सिटिओ व्हिटियर यानं केलेलं या पुस्तकाचं
रसग्रहण आणि चैनं त्याच्या सुरुवातीच्या वर्षांत मेडिकलच्या विद्यार्थ्यासमोर
केलेलं भावपूर्ण भाषण या सगळ्यांचा समावेश आहे."