हे पुस्तक म्हणजे यशस्वी होण्याचा मूलमंत्र ! काही लोक
यशस्वी होतात, तर काही अयशस्वी. काही जण समृद्धीच्या वर्षावात न्हाऊन निघलात, तर काहींना दारिद्रयाचे चटके सहन करावे लागतात. काहींच्या आयुष्यात नात्यांची मधुरता असते, तर काही जण वादविवादाच्या, अविश्वासाच्या भडाग्नीत होरपळून निघतात. काहींकडे स्वास्थ्याची दौलत आणि मन:शांती असते, तर काही जण आजारांनी बेजार असतात. असं का बरं ? या सर्वांची उत्तरं आहेत
या पुस्तकात! तुम्हाला शारीरिक, मानसिक, नातेसंबंध, आर्थिक व आध्यात्मिक स्तरावर यशस्वी व्हायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.
* अंतर्मन आणि बाह्यमन म्हणजे काय ?
नेहमी आनंदी, प्रसन्न राहण्याचं रहस्य
या पुस्तकात वाचा
* स्वस्थ आरोग्यासाठी मानसिक उपचार * पैसा आकर्षित कसा कराल ?
* आरोग्यसंपन्न आयुष्याचं गुपित
* अपयशातून यशाकडे जाण्याची गुरुकिल्ली * सुखी वैवाहिक जीवनाचं सूत्र * करिअरमध्ये यशस्वी कसे व्हाल ? * भयमुक्त, चिंतामुक्त कसे व्हाल ? जे हवंय ते कसे प्राप्त कराल ?