पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक, आणि धंद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते, यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत. ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात... जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात.
पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोकं पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ गोष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्वाच्या विषयांपैकी एक अशा 'पैसा' या विषयावर महत्वाचे धडे देत आहेत.