यशाची सवय होणे आणि सवयीतून यश संपादन करणे. यातही एकदा तुम्ही यशाची चव चाखलीत की मग त्याचे विस्मरण तुम्हाला कधी होणार नाही. तुम्ही जर चांगल्या, मोठ्या व भरीव आयुष्याचे स्वप्न पहात असाल, प्रस्तुतचे अमर्याद चैतन्यक्षमता हे पुस्तक तुम्हाला तुमच्या इच्छा व पात्रतेनुसार असामान्य गुणवत्तेचे संपादन कसे करावे, हे दर्शवेल. र आपल्या लेखनासह चर्चासत्र-व्याख्याने यांच्या माध्यमातून अँथोनी रॉबीन्स आता लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहेत. आपल्या मनाच्या अमर्याद चैतन्य शक्तीला गवसणी घालत, आयुष्यातील स्वप्नवत व अशक्यप्राय गोष्टी सहज साध्य कशा कराव्यात, या विषयी रॉबीन्स सतत बोलत असतात. अमर्याद चैतन्यक्षमता हे खरोखरीच एक क्रांतिकारी पुस्तक असून ते आपल्या मनाचे सखोल प्रबोधन करते. इतकेच नव्हे तर, भावनिक आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे, आपल्या नेतृत्व गुणांचा विकास कसा साधावा आत्मविश्वासाचा विकास व समृद्धी कशी संपादन करावी, या विषयी हे पुस्तक तुमच्याशी हितगूज करेल. आनंदाची कास धरत अमर्याद चैतन्य क्षमतेसह यश वैभव प्रत कसे जायचे, याचे मार्गदर्शन अमर्याद चैतन्यक्षमता हे पुस्तक करते. आंद्रे आगासी रॉबीन्स म्हणजे चालत्या बोलत्या ऊर्जेचा आणि आत्मियतेचा झरा आहे. टाईम आऊट