"आपण सगळे पुस्तक वाचलो. मित्रवर्य नीतिन वैद्य पुरतकं जगतात. वैद्य पुस्तकं अंधरतात, पांघरतात; पुस्तकांना न्हाऊ-माखू घालतात, अंगडे-टोपडं चढवतात. से पुस्तकांशी बोलतात, पुस्तकांचं
ऐकतात-ऐकवतात. या तीव्र, उत्कट ओढीतून ‘वाचनप्रसंग’ लिहिलं गेलंय.
वेळोवेळी वाचलेल्या पुस्तकांवर लिहिलेली रसाळ, मर्मग्राही टिपणं, असा ‘वाचनप्रसंग’चा बाज आहे. पुस्तकाची थोडक्यात माहिती देऊन वैद्यांचं भागत नाही: पुस्तकाच्या निरनिराळ्या असोसिएशन्सविषयी ते सहज
लिहून जातात. चिमूटभर मागचं पुढचं सांगतात. ठिपके ठिपके जोडतात आणि वाचनातलं सुजन वेचतात. मध्येच एखादी सुरेख आठवण कडाडून जाते; एखादं सूक्ष्म निरीक्षण किंवा अभिप्राय–आणि पुस्तकातला गर्भगूढ काळोख लकन् उजळून
निघतो. हे ‘वाचनप्रसंग’चं यश आहे.
वैद्यांची शैली मनाची पकड घेणारी: मूळच्या रसिकलेला चिंतन नि प्रगल्भतेची जोड मिळाल्यामुळे त्यांच्या लिखाणात साक्षेप आहे, शालीनता आहे. ‘वाचनप्रसंग’च्या प्रत्येक पानावर त्र्यं. वि. सरदेशमुखांची वत्सल
सावली रेंगाळतेय. वैद्यांची भूक अमर्याद आहे. कथा-कादंबन्या, प्रवासवृतांत, निबंध, इतिहास, नाटक, व्याख्यानं त्यांच्या तडाख्यातून काहीही सुटत नाही.
बदलत्या काळात, नव्या संदर्भात अभिजात साहित्यकृतींची नवी बाधनं होतील, म्हणून ‘वाचनप्रसंग’चं विशेष महत्व आहे, असं वाटलं. पुस्तक ही एक सुंदर जखम असते नि ती कधीच भरून येत नाही. नीतिन वैद्यांची जखम सतत भळभळत राहो,
– अंबरीश मिश्र"